मोहोळ भाजप उत्तर मंडल तालुकाध्यक्षपदासाठी सातजण इच्छुक
भारतीय जनता पार्टी मोहोळ उत्तर मंडल तालुकाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी शशिकांत चव्हाण व सरचिटणीस मनिष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. दरम्यान, या पदासाठी सुशील क्षीरसागर, सतीश काळे, अविनाश पांढरे, सुरेश राऊत, गणेश झाडे, गुरुराज तागडे, संतोष माने आदी ७ पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरला.
यावेळी निवड प्रक्रियेमध्ये प्रदेश कार्यालयातून आलेल्या निर्देशानुसार प्रत्येक इच्छुक तालुकाध्यक्ष पदासाठी उमेदवाराला सूचक अनुमोदन असा अर्ज भरून घेण्यात आले असून सर्व इच्छुकांचे अर्ज बंद लिफाफ्यात प्रदेश कार्यालयास पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपाच्या वतीने कुणालाही तालुकाध्यक्ष पद मिळालं तरी सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये मोहोळ उत्तर मंडलमध्ये भाजप पक्ष आणखीन कसा वाढेल याकरिता आपण काम करू, असे यावेळी सरचिटणीस शशिकांत चव्हाण व मनीष देशमुख यांनी म्हटले. तर सरचिटणीस शशिकांत चव्हाण व मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शना मध्ये मोहोळ उत्तर मंडल तालुक्यातील पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास नगरसेवक सुशील क्षीरसागर
यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, सरचिटणीस विकास वाघमारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, ब्रह्मदेव गोफने, मुजीब मुजावर, नवनाथ चव्हाण, विशाल डोंगरे, महेश सोवनी, ज्ञानेश्वर भोसले आदी उपस्थित होते.
0 Comments