Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर आ. सुभाष देशमुखांच्या निर्णयाने बसणार दिग्गजांना धक्का !

 सोलापूर बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर

आ. सुभाष देशमुखांच्या निर्णयाने बसणार दिग्गजांना धक्का !

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर बाजार समितीची निवडणूक लागली असून अनेकांनी संचालक होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे आपल्या नेत्याचा फोन का येईना म्हणून भावी संचालक वाट बघत बसले आहेत. इकडे माघार घेण्याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. या सर्व कचाट्यात फॉर्म ठेवू का काढू? अशा द्विदा मनस्थितीत फॉर्म भरलेले भावी संचालक सापडले आहेत.

दोन दिवसापूर्वी आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एकत्र येऊन चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. आ. सुभाष देशमुखांचे काही कार्यकर्ते आ. कल्याणशेट्टी यांच्याबरोबर जाऊ, काही समर्थक माजी आमदार दिलीप माने यांच्याबरोबर तर काही कार्यकर्ते भाजप म्हणून आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू, अशी मागणी करत असल्याची चर्चा झाल्याची भाजपाच्या गोटातून माहिती पुढे येत आहे.

आ. सुभाष देशमुख सर्वांचे शांतपणे ऐकून घेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणाला आ. देशमुख हे कोणता राजकीय डावपेच खेळणार? याचा अंदाज मात्र कोणालाच आलेला नाही. सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांसह कार्यकतें मागच्या दाराने आ. देशमुखांना भेटून जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर इकडे माजी आमदार दिलीप माने हे सध्या कार्यकत्यांसह प्रत्यक्ष मतदारांना भेटून कानोसा घेत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments