Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे, भाजपचा संविधान बदलण्याचा षडयंत्र, पण जोपर्यंत काँग्रेस आहे तो पर्यंत संविधान बदलू देणार नाही : खासदार प्रणिती शिंदे

  देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे, भाजपचा संविधान बदलण्याचा षडयंत्र,

 पण जोपर्यंत काँग्रेस आहे तो पर्यंत संविधान बदलू देणार नाही 

: खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली. पण भाजपला लोकशाही मान्य नाही. त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत. नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. चारसो पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता. पण त्यांचे षडयंत्र उघडे पडले. लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे. संविधान बोलण्याच्या घाट घातला जातोय. पण जोपर्यंत काँग्रेस आहे तो पर्यंत संविधान बदलू देणार नाही.

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, आरिफ शेख, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, मा. नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. मनोज यलगुलवार, मधुकर आठवले, N.K.क्षीरसागर, रॉकी बंगाळे, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, भीमाशंकर टेकाळे, हेमाताई चिंचोलकर,  तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, पशुपती माशाळ, अनिल मस्के, भोजराज पवार, बाबुराव म्हेत्रे, लखन गायकवाड, हारून शेख, सागर उबाळे, संजय गायकवाड, दिनेश म्हेत्रे, श्रीनिवास रामगल, संघमित्रा चौधरी, मीरा घटकांबळे, शुभांगी लिंगराज, गौतम मसालखांब, बाबू विटे, श्याम केंगार, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, बंटी चंदनशिवे, रमेश फुले, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना, विवेक इंगळे, सुशीलकुमार म्हेत्रे, सायमन गट्टू, अनुपम शहा, वीणाताई देवकते, करीमुनिस्सा बागवान, नागेश म्हेत्रे, बाबू विटे, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, अनिता भालेराव, प्रियांका गुंडला, चंद्रकला निजमल्लू, रफिक रामपूरे, बाबाभाई शेख, चंद्रकांत टिक्के, जितू वाडेकर, मीना गायकवाड, शाहू सलगर, अश्विनी सोलापुरे, महेंद्र शिंदे, सुनंदा साबळे, पुष्पा तळवे, स्नेहल शिंदे, सायना पठाण, संविधान आठवले, अभिलाष अच्युगटला धनलक्ष्मी देशमाने, सुनील रोडगे, अकबर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments