छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-संविधाना मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य, बंधुता, न्याय दिला म्हणून आज सर्व भारतीय म्हणून अभिमान बाळगतो. सर्व भारतीयांनाही संविधानाचे महत्व जाणून घेऊन आचरण करावे असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, मुस्लिम ब्रिगेडचे बशीर सय्यद, हारुण शेख, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, रिजवान पैलवान , कादर भागानगरी , कय्युम मोहळकर, वाहिद तांबोळी, हारिस शेख, बाबा शेख, नईम करनूल, खाशिम बेलीफ गफूरभाई बागवान, रुस्तुम, मोहसीन सिंदगी, अफ्फान बागवान,जैद बागवान, अयान बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments