Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री गोरे यांना नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले निवेदन

 पालकमंत्री गोरे यांना नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले निवेदन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्र. 26 ब मधील रेणुका नगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उद्धव नगर भाग एक प्लॉट नंबर 18 गडगी घरापर्यंत डी.पी रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ता करणे. 
प्रभाग क्रमांक 26 ब मधील आर्यन वर्ड स्कूल ते रेणुका नगर जवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथील डांबरी रस्ता करणे.
प्रभाग क्रमांक 26 ब मधील रेणुका नगर भीमाशंकर नगर अपार्टमेंट ते कृष्णा बाग,साक्षी नगर,उद्धव नगर, रेणुका नगर, बंडे नगर,दत्त तारापार्क, प्रल्हाद नगर,प्रियंका नगर,रजनीश रेसिडेन्सी पार्क,आदित्य रेसिडेन्सी, विश्वनगर,शिवभारत पार्क, चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच डीपी रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ता करणे.
प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ड स्कूल ते रेणुका नगर प्लॉट नंबर 712 ते कटगेरी सर प्लॉट नंबर 671 सर्वे नंबर 99/1/ ब येथे डीपी रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरीकरण रस्ता करणे.
प्रभाग 26 ब मधील रेणुका नगर प्लॉट नंबर 520 ते रेणुका नगर प्लॉट नंबर 16 पर्यंत डीपी रस्ता मंजूर असेल त्या ठिकाणी डांबरी रस्ता करणे.
असे निवेदन दिले असून ह्यापूर्वीही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांना दिनांक 14/1/2024 रोजी निवेदन दिले असून त्यावर आणखीन कुठलीच उपाययोजना झालेली नाही हेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आठवण करून दिली. त्यावेळी नामदार पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले की माजी नगरसेवक, कट्टर भाजप कार्यकर्ते यांनी सुचवलेले काम प्राधान्याने करण्यात येईल तसेच तुमचे सुचवलेली कामे कुठलेही गट तट न करता प्राधान्याने करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये आदिवासी पारधी समाजाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका,भाजपा अनुसूचित जमाती सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा पश्चिम महाराष्ट्र मीडिया प्रमुख दिनेश भोसले यांची आदिवासी समाजाच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी जिल्हा नियोजन कार्यालय येथे नियुक्ती करणे बाबत निवेदन दिले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांनी शासकीय आय.टी.आय इलेक्ट्रिशन कोर्स करून एम.एस.ई.बी. मध्ये ॲपरेशिप कोर्स करून ही अद्याप पर्यंत त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट न केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी वरील सुशिक्षित बेरोजगार यांना एम.एस.ई.बी. विभागामध्ये नोकरीची तरतूद करून द्यावी असे निवेदन दिले. 
त्यावेळी भाजपा अनुसूचित जमाती जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण हे उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments