Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवालय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

 लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवालय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकनेते स्व ब्रम्हानंद मोरे यांच्या 26 व्या स्मृतीदिनानिमित्त मोरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवालय सामाजिक संस्थेच्या वतीने विरतपस्वी प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २२८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात ओ निगेटिव्ह सारख्या दुर्मिळ रक्त दात्यांचा ही समावेश होता. 
               काशीपिठाचे जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले या प्रसंगी माजी मंत्री विजयकुमार देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, शिवानंद पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, मार्गदर्शक विनोद मोरे, आधारस्तंभ प्रमोद मोरे, सिव्हिल सर्जन डॉ सुहास माने यांची उपस्थिती होती.

 मेडिकेयर या रक्तपेढी च्या माध्यमातून आयोजित शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थापक प्रकाश शिंदे, संस्थेचे मार्गदर्शक राम गायकवाड सर, उत्सव अध्यक्ष हरिश सिध्दे, मोहन चटके, शुभम नीळ, राज पुणेकर, अमोल कामाने, शिवानंद सोलापूरे, सुरेश रुपनर, विनोद शिंदे, शिव कलशेट्टी, विक्रम जाधव, अभिजीत बिडवे, सिधु भुतनाळे, रोहन म्हमाणे, रितेश कदम, प्रशांत बिराजदार,सागर  चव्हाण, किरण शिंदे, राम मुदगल, ज्योतिराम मोरे, रमाकांत ताटे,सौराज चव्हाण ,आकाश पुलसे ,संकेत पाटील, योगेश कोप्पल,शशिकांत यादव,रोहन काटे, विशाल मस्के, सोमा गुड्डाराम , व सर्व शिवालय टीमने परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments