Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यसेनानी संदिपानदादांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात ७3९ जणांनी घेतला लाभ

 स्वातंत्र्यसेनानी संदिपानदादांच्या स्मृतिदिनानिमित्त

घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात ७3९ जणांनी घेतला लाभ

 मोहोळ (कटूसत्य वृत्त):-स्वातंत्र्यसेनानी संदिपान गायकवाड स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानी संदीपान दादा गायकवाड बहुउद्देशीय व संशोधन संस्था मोहोळ आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व रोग निदान शिबिरामध्ये सुमारे ७३९ जनानी त्याचा लाभ घेतला असून येणाऱ्या काळात दर महिन्याला सदरील मोफत शिबिर सुरू ठेवण्यात येणार असून या माध्यमातून शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक डॉ. कौशिक गायकवाड यांनी दिली.

मोहोळ येथील स्वातंत्र्यसेनानी संदिपान गायकवाड सभागृहात भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी याचे उदघाटन जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांच्या हस्ते तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास व्यवहारे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

या वेळी डॉक्टर कौशिक गायकवाड, अशोक गायकवाड, सुरेश गायकवाड, डॉ. दिलीप कादे, डॉ. नासीर खान, डॉ. सुनील गायकवाड, डॉ.सचिन भोसले उपनगराध्यक्ष प्रमोद डोके नगरसेवक, नगरसेवक तथा मोहोळ नागरी सहकारी पत्तसंस्थेचे व्यवस्थापक मुस्ताक शेख, आरोग्य ओपीडीचे सचिन शास्त्री आदि उपस्थित होते यावेळी या शिबिरामध्ये रेड स्वास्तिक सोसायटीचे सुरेश कोते, डॉ. अशोक घोणे, अशोक शिंदे, डॉ. क्रांती महाजन, डॉ. जे एस दुगल, डॉ. राम पाटील, डॉ. मंदार पाटील, डॉ. मंजिरी पाटील, डॉ. सुनील साळवे, डॉ. प्रवीण मासाळ, डॉ. अमेय ठाकूर, डॉ. अच्युत नरोटे यांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी करून औषध उपचार केले.

या महाआरोग्य शिबिरात संयोजकामार्फत वेगवेगळ्या विभागात केलेल्या तपासणी शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, अर्धांग वायू उपचार, न्युरो, मेंदू, मणके, यकृत, किडनी, ब्रेनस्ट्रोक, स्त्रीरोग, कृत्रिम अंग प्रत्यारोपण, तपासणी व उपचार शस्त्रक्रियासह बीपी, शुगर, थायरॉइड, ईसीजी, रक्ताच्या सर्व चाचण्याही विनामूल्य करण्यात आल्या. यासह विविध आजारासाठी वेगवेगळ्या विभागात दिवसभर गरजू रुग्णांनी भेटी देऊन तपासणी केले असून आवश्यकतेनुसार पुढील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या महाआरोग्य शिबिराचे नेटके नियोजन चंद्रमोळी पतसंस्थेचे चेअरमन राजेश खपाले, चंद्रमोळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राकेश देशमाने, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नाना डोके, उपसरपंच विजय कोकाटे, वैभव गुंड, चंद्रकांत वाघमोडे, श्रीकांत गायकवाड, मोहन होनमाने, गाटे साहेब, सुनिल साठे, नितीन टिळे, तेजस बोबडे, भाऊसाहेब गायकवाड, अनिल नाईक, शैलेश गावडे आदीजनानी  केले.

Reactions

Post a Comment

0 Comments