Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समिती निवडणुकीत आ.कल्याणशेट्टी, सुभाषबापूत जुंपली

बाजार समिती निवडणूक  

आ.कल्याणशेट्टी, सुभाषबापूत जुंपली 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन पॅनल उभारण्याची घोषणा भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार होणार असल्याने आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्यासोबत यावे, असे जाहीर आवाहन कल्याणशेट्टी यांनी केले. दरम्यान, कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवार भाजपचे कार्यकर्ते असतील तर सोबत यायला तयार आहे, असे प्रत्युत्तर सुभाषबापूंनी दिले.

 उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या, बुधवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, शहाजी पवार, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, आदी उपस्थित होते. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, बाजार समितीसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. सहकारी संस्था, बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय राजकारणावर होत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल आहेत. 'इलेक्टिव्ह मेरीट'नुसार उमेदवारीचा निर्णय होईल. उमेदवार जास्त असल्याने निवडणूक लागेल.

Reactions

Post a Comment

0 Comments