Hot Posts

6/recent/ticker-posts

तब्बल 9 तास चालेल्या बार्शीच्या आमसभेत चक्क गुटख्याच्या पुड्या उधळल्या;

 तब्बल 9 तास चालेल्या बार्शीच्या आमसभेत 

चक्क गुटख्याच्या पुड्या उधळल्या;

पोलिसांचा निषेध, अधिकाऱ्यांना धरले धारेवर!!

बार्शी (कटूसत्य वृत्त):-बार्शीची  आमसभा सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झाली. ती रात्री आठपर्यंत चालली. तब्बल नऊ तास ही आमसभा चालली. आमसभेत रस्त्यांची कामे आणि त्यांचा दर्जा, अवैध धंदे, त्यातही अवैध गुटखा विक्रीवरून नगारिक आक्रमक होते. पहिल्या तासापासूनच नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण आमसभेत चांगलीच खडाखडी रंगली होती. बार्शीच्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) होते. खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, गणेश जाधव, नागेश अक्कलकोटे, मकरंद निंबाळकर, निरंजन भूमकर, तहसीलदार एफ. आर. शेख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या चार वर्षांपासून सरकारच्या सर्व विभागाचा कारभार हा प्रशासकाच्या नात्याने अधिकाऱ्यांच्या हातात आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नगारिकांकडून कडक ताशेरे ओढण्यात आले. प्रशासकीय विभागातील सावळा गोंधळ, मनमानी कारभार, निकृष्ठ कामे, पैसे घेऊन होणारी कामे यांसह पाणीपुरवठा, वीज,दुय्यम निबंधक,रस्त्यांची निकृष्ट कामे, बंदी असताना बार्शी तालुक्यात राजरोजसपणे होणारह गुटखा विक्री यांसह अनेक प्रश्नांवर आमसभेत नागरिकांनी आमदार, खासदार यांच्यासमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हतबल झालेल्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता देता नाकीनऊ आले होते. कोट्यवधी रुपये खर्चूनही बंधाऱ्यांची कामे निकृष्ठ दर्जा झाली आहेत, त्या बंधाऱ्यांना दरवाजेही नाहीत, त्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडत नाही. बंधाऱ्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत, दगड आणि मुरमाची चोरी, ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांना पैसे मागितले जात आहेत. शेतकऱ्यांना २०२२ पासून वीज जोडणी मिळालेली नाही, रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. बार्शीचा शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, बार्शी शहरातील अवैध धंदे, विशेषतः बंदी असतानाही होणारी गुटखा विक्री आदी मुद्यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याच वेळी काही नागरिकांनी गुटख्या पुड्या सभेत उधळून पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून अधिकाऱ्यांवर होणारी प्रश्नांची सरबत्ती पाहून खासदार-आमदारही अवाक झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments