बंद असलेले रंगभवन स्पर्धापरिक्षा अभ्यासकेंद्र 2 दिवसात सुरु होणार

आमदार प्रणिती शिंदे यांचा मा. कुलगुरु यांच्याशी झालेल्या चर्चेअंती निर्णय
सोलापूर (कटुसत्य वृत्त): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरातील सर्व अभ्यासकेंद्र बंद करण्यात आले होते. परंतू गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सर्व अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आले आहे. सहस्त्रार्जुन शासकीय वाचनालय, हिराचंद नेमचंद वाचनालय, विद्यानिकेतन व इतर सर्व अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. परंतू रंगभवन येथील अभ्यासकेंद्र आजतागायत सुरु करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. सद्या रेल्वेचे परिक्षा, पोलीस भरती परिक्षा व इतर स्पर्धा परिक्षांची तारीख जाहिर करण्यात येत आहे. सदरच्या अभ्यासकेंद्रामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी हे गोर-गरीब कुटुंबातील आहेत. सदरच्या अभ्यासकेंद्र बंद असल्यामुळे स्पर्धापरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. स्पर्धापरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रंगभवन अभ्यासकेंद्र सुरु करण्याकरीता मला स्वयंस्पष्ट निवेदन दिलेले होते.
त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत रंगभवन स्पर्धापरिक्षा अभ्यासकेंद्र तात्काळ सुरु करून गोर-गरीब विद्यार्थ्यांना तेथे अभ्यास करण्याची परवानगी देण्याबाबत सांगितले, याबाबत मा. कुलगुरु यांनी संबंधितांना आदेश देवून येत्या दोन दिवसांमध्ये रंगभवन स्पर्धापरिक्षा अभ्यासकेंद्र सुरु करण्यास सांगितले.
0 Comments