ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पुर्ण करण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूर शहरामध्ये हद्दवाढ भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत. परंतू पाऊस व इतर कारणांमुळे सदरचे काम बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत हद्दवाढ भागातील नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी अमृत योजनेशी संबंधित अधिकारी श्री. संजय धनशेट्टी तसेच दास कस्टक्शनचे श्री. संतोष बडवे, श्री. बक्षी व हद्दवाढ भागातील नागरीकांसोबत संयुक्त बैठक आयोजित करून सदर भागातील नागरीकांच्या समस्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच हद्दवाढ भागातील अमृत योजनेअंतर्गत होणारे ड्रेनेज लाईनच्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्यानुसार अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेले ड्रेनेज लाईनचे काम उद्या पासून युध्द पातळीवर करण्यात येणार असल्याचे आश्वासन श्री. संजय धनशेट्टी व दास कस्टक्शन यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले. त्यामुळे हद्दवाढ भागातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री. संजय कदम यांच्याशी संपर्क साधून अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायर या गृहनिर्माण संस्थेसमोरील सर्व्हिस रोडची मागणी केली. त्याप्रमाणे सर्व्हिस रोडचा प्रस्ताव तयार करून त्यास लवकरच मान्यता प्राप्त होवून सर्व्हिस रोडचे काम येत्या दोन महिन्यामध्ये सुरु करण्याचे आश्वासन श्री. संजय कदम, प्रकल्प संचालक यांनी दिले.
0 Comments