टेंभुर्णी येथील टायरचे दुकान फोडून 77 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

सोलापूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेले सुमित पेट्रोल पंपासमोर रील सिद्धिविनायक व्हिलअलाईमेन्ट टायर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 77 हजार रुपये लंपास लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सविस्तर मिळालेली माहिती अशी की सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथील महादेव दत्तू ढगे राहणार भवानीनगर टेंभुर्णी यांचे मालकीचे जुन्या सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुमित पेट्रोल पंपासमोर असलेले सिद्धिविनायक टायर, व्हिलअलाईमेन्ट दुकान अज्ञात चोरट्यांनी आज सोमवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दुकानाच्या पाठीमागील बाजूने वरती चढून पाठीमागून दुकानावरील कोटींग पत्रे उचकटून दुकानांमध्ये उतरून दुकानांमध्ये असलेली बॅगमधील रोख रक्कम उद्याच्याला व्यापारी यायचे म्हणून ठेवलेली 77 हजार रुपये बॅग मधील घेऊन अज्ञात चोरट्यांनी पैसे घेऊन फरार झाला असून सदर अज्ञात चोरटा दुकानाच्या सीसी टीव्ही मध्ये काय झाला असून याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दुकान मालकाने तक्रार दिली आहे.
0 Comments