Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद

मोहोळसाठी अर्थसंकल्पात ४०  कोटी रुपयांची तरतूद 

मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे 'आष्टी उपसा सिंचन योजने' च्या कामासाठी 100 कोटी ची मागणी केली होती. मोहोळ तालुक्यातील दहा गावांच्या शेतकऱ्याच्या  जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या 'आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन' या योजनेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात 40 कोटी रुपयांची तरतूद केली असून या योजनेचा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. या संदर्भात माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, या योजनेचा प्रस्ताव दाखल करते वेळी अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजना या नावाने दाखल केला होता, मात्र शासन दरबारी तपासणी करून याच योजनेचे आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन असे नामकरण करण्यात आले. माजी आमदार पाटील यांनी 14 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे या योजनेच्या कामासाठी 100 कोटी ची मागणी केली होती, तशा आशयाचे लेखी पत्र ही दिले होते. त्याच मागणीचा विचार करून चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली. दरम्यान या योजनेमुळे देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, चिखली, व अनगर या गावातील शेतकऱ्यांचे 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे. निधी मंजूर झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनि आनंदोत्सव साजरा केला. या योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे माजी आमदार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments