पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल गणेश नरळे याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
पिरळे ता. माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील पिरळे गावचे सुपुत्र गणेश चंद्रकांत नरळे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतिश सपकाळ यांच्या हस्ते नातेपुते येथील शिवसेना कार्यालय येथे सत्कार करण्यात आला, याप्रंसगी नातेपुते शहर प्रमुख पै.निखिल पलंगे,फोंडशिरस जिल्हा गट प्रमुख अनिल दडस,शिवसैनिक संग्राम मस्कर, विकास मस्कर, हर्षद शिंदे, सुरज नरळे, सुधीर नरळे,मंगेश अवघडे सह आदीजण उपस्थित होते.
0 Comments