हिंदू -मुस्लिम सामाजिक सलोखा कायम राहील- ऍड सचिन चव्हाण
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-
मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू असून रोजा(उपवास) सोडण्यासाठी २८ मार्च रोजी चव्हाणवाडी(टें) काझी वस्ती येथे सालाबाद प्रमाणे रोजा इफ्तार पार्टीचे चव्हाण परिवाराच्या वतीने ऍड सचिन चव्हाण यांनी आयोजन केले होते.
रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. रमजान महिना इस्लाम धर्मातील पवित्र महिना आहे या महिन्यात मुस्लिम समाज बांधव सुर्योदयापासुन सुर्यास्तापर्रंत कडक रोजे करतात या काळात अन्नपाणी कसलेही ग्रहण केले जात नाही तसेच अशा वेळी रोजा करणारा व्यक्ती फक्त अन्नपाणीच नाही तर सर्व वाईट गोष्टी पासून ही दुर असतो. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आपणच आपापसांत बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच आपल्या गावांमध्ये धार्मिक व सामाजिक सलोखा कायम राहील असे प्रतिपादन ऍड सचिन चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास शुभेच्छा देताना हनुमंत चव्हाण म्हणाले की, सामाजिक जातिय सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक एकोपा निर्माण होण्याकरिता इफ्तार पार्टीचे मदत होत असुन एकमेकांबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण होते असते.
यावेळी सुभाष इंदलकर-पाटील यांनी सामाजिक एकोपा काय जपला पाहिजे व अशा सामाजिक कार्यातनच एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होत असते असे बोलून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच उद्योजक अय्युब पटेल बोलताना म्हणाले की, हिंदू समाज बांधव आपल्या सणा निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात तसेच मुस्लिम समाज बांधवांनीही हिंदू समाज बांधवांसाठी उपक्रम राबविले पाहिजेत यामुळे साहजिकच एकोपा वाढतो असतो असे सांगितले.
यावेळी सोसायटी चेअरमन कैलास चव्हाण,माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण,माजी सरपंच नवनाथ शिंदे,अय्युब पटेल, सोमनाथ कदम,विजय कदम, बाळासाहेब मोटे, बाळासाहेब चव्हाण, धनंजय भोसले,रमेश नांगरे,शाम नांगरे, सुधिर नांगरे,डॉ.शहाजहान काझी,अजिज शेख, इम्तियाज सय्यद,जावेद काझी, आसिफ काझी,कुदरत काझी, अमिर काझी,जमाल काझी,शाहीद काझी, अल्ताफ काझी, कमाल काझी, शरिफ काझी,मोहसीन इनामदार, ऍड गणेश चव्हाण,संग्राम चव्हाण, भाऊराव इंदलकर,रोहन चव्हाण, सचिन शिंदे,जोतिराम शिंदे, संग्राम नांगरे,सागर चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments