Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपती फार्मसीची गोविंद वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी

 गणपती फार्मसीची गोविंद वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी




टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-
टेंभुर्णी येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च च्या  विद्यार्थ्यांनी गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी येथे भेट देत सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले. या भेटीचे मुख्य उद्दीष्ट वृद्धांसोबत संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे, त्यांची गरज जाणून त्यांना मदत करणे आणि त्यांना भारतीय संस्कृतीनुसार सन्मानाची व आपुलकीची भावना देणे हा होता.

विद्यार्थ्यांनी वृद्धांसाठी रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन आणि बीएमआय (BMI) यांसारख्या मूलभूत आरोग्य तपासण्या केल्या. याशिवाय, त्यांना फळे,जीवनावश्यक व अन्य उपयुक्त वस्तू वितरित करण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान, वृद्धांशी संवाद साधून त्यांच्या जीवनातील अनुभव ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. वृद्धाश्रमातील नागरिकांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि आठवणी सांगून विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.

या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीत वृद्धांचा सन्मान करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतीय संस्कृतीत जसे माता-पित्यांना आणि वृद्धांना देवतुल्य मानले जाते, तसेच त्यांच्या अनुभवाचा योग्य तो आदर करणे हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे. संस्थेचे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनीही या उपक्रमाबद्दल आपले विचार मांडले आणि असे सामाजिक कार्य नियमितपणे केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे सांगितले.

या वेळी प्रा. धनश्री करंडे, प्रा. रुपाली राऊत, प्रा. सुकेशिनी पाटील, प्रा. पूजा शिंदे, प्रा. केतकी पाटील, प्रा. पूजा शिरसकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे आणि प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे उपस्थित होते.

हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला असून, विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments