Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे तेज ज्ञान रथाचे आगमन

 नातेपुते येथे तेज ज्ञान रथाचे आगमन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- तेज ज्ञान फाउंडेशन या संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाली असल्याने रजत जयंती महोत्सवानिमित्त तेज ज्ञान रथ बनवण्यात आलेला आहे. हा रथ सर्व महाराष्ट्रात तेजग्यान फाउंडेशन हॅपी थॉट्स याचा प्रसार प्रचार करण्यासाठी उपयुक्त होणार आसुन मानव जीवनाच्या महत्त्वपूर्ण पैलूंच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असणारे पुस्तके वाचकांना या रथा द्वारे वाचनासाठी उपलब्ध होणार आसल्याचे नातेपुते येथील तेज ज्ञान सेंटरचे संदीप गटकुळ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
नातेपुते दहिगांव रोड येथील तेज ज्ञान फाउंडेशनचे हॅपी थॉट सेंटर या ठिकाणी तेज ज्ञान फाऊंडेशनच्या रोप्य मोहत्सवी तेज ज्ञान रथाचे आगमन झाले. यावेळी श्रीनिवास खराडे, विजयालक्ष्मी खराडे, नवनाथ पिसे, शांतीसागर उराडे, मनीषा गटकुळ, प्रियंका कलाल, शिवलिंग जमखंडी यांनी तेज ज्ञान रथाचे स्वागत केले.वाचन संस्कृती आणि ज्ञानाचा वसा जोपासण्याच्या उद्देशाने तेज ज्ञान फाउंडेशन कडून सुरू झालेल्या तेज ज्ञान रथामध्ये सरश्री लिखित पुस्तके यामध्ये निर्णय आणि जबाबदारी, छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन कशाला,  सुसंवाद एक जादू, विचार नियम, क्षमेची जादू, द मन, स्वास्थ्यासाठी विचार नियम, प्रभावी संवाद कसा साधता येईल,  तणावमुक्त,  भगवदगीता, संत तुकाराम, सद्गुरु नानक, संत नामदेव, रामकृष्ण परमहंस, आदि शंकराचार्य, भगवान महावीर, असे विविध प्रकारचे पुस्तके वाचकांसाठी या रथामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.नातेपुते शहरात चौका चौकात तेज ज्ञान रथ उभा करून नातेपुते व परिसरातील नागरिकांनी सरश्रीचे पुस्तक वाचण्यासाठी विकत घेण्याचा लाभ घेतला. 
Reactions

Post a Comment

0 Comments