Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

 सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी





सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके पाण्यावाचून करपून चालली आहेत. अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून तसेच निरा उजवा शाखा नं. ४ व ५ चे उन्हाळी आवर्तन सुरु करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
      राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली. तालुक्यातील खवासापूर, लक्ष्मीनगर, चिकमहुद, नराळेवाडी, व वाकी गावांना राजेवाडी तलावातून प्रत्येक वर्षी पाच आवर्तने सोडण्यात येतात. परंतु चालू वर्षी उन्हाळी आवर्तने  प्रकरण प्रसिद्ध केले नाही. सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके आहेत. सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजेवाडी तलावातून उन्हाळी आवर्तने प्रसिद्ध करून वरील गावांना पाणी सोडण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
          तसेच तालुक्यातील वाकी, शिवणे, चिंचोली, शेळकेवाडी, एखतपूर या गावातील लाभधारक शेतकऱ्यांना नीरा उजवा कालवा शाखा नं. ४ व ५ मधून पाणी मिळते. परंतु आता नीरा उजवा कालवाचे शाखा नं. ४ व ५ ला  उन्हाळी आवर्तन सोडले नाही. सदर गावामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डाळींब, बोर, आंबा, केळी अशी पिके आहेत. सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून भाटकर धरणामध्ये उन्हाळी आवर्तन करून पाणीसाठा शिल्लक आहे. तरी शिलक पाण्यामधून शाखा नं. ४ व ५ ला वरील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून तत्काळ पाणी सोडण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments