संभाजी ब्रिगेड ने उभारली परिवर्तनवादी गुढी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर मध्ये संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भगवा ध्वजारोहण करून व महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली. बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारुन देऊन कात टाकत आहे आणि नवविचाराचे स्वागत करून अंगीकार करत आहे. त्याचेच हे प्रतिक असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडवा हा सण शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येतो त्या काळी भगव्या पताका उभारण्यात येत असे पण संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या गुढीचे स्वरुप बदलण्यात आले. वारकरी संप्रदाय ची गुढी भगव्या रंगाची आहे. बुद्धांने भगव्या रंगाचे चिवर निवडले. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लाऊन संभाजी राजाना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी, हाच खरा गुढीपाडवा आहे असे आवाहन केले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुघन माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास सुनिता घंटे माणिक यादव वशिष्ठ सोनकांबळे एडवोकेट गणेश कदमप्रशांत देशमुख संतोष सुरवसे यशवंत लोंढे दिलीप निंबाळकर पृथ्वीराज सुरवसे रमेश भंडारी राजेंद्र माने लखन पारसे सतीश वावरे सिद्धराम सावळे शेखर कंटेकर प्रेम भोसले आदी उपस्थित होते.
0 Comments