Hot Posts

6/recent/ticker-posts

पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातुन २६ हजार ९८८ प्रकरणे सामंजस्याने निकाली

पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातुन २६ हजार ९८८ प्रकरणे सामंजस्याने निकाली



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन २०२५ मधील पहिली राष्ट्रीय लोक अदालत दि.२२ मार्च २०२५ आयोजित करण्यात आली. पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून २६ हजार ९८८ इतकी प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली, लोक अदालती मध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोड मुल्य १०८ करोड ६८ लाख ६३ हजार ३०६ इतके राहीले. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून २९ जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुर्नस्थापित झाले.

सन २०२५ मधील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त  एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश  योगेश राणे, जिल्हा सहकारी वकील  प्रदीप रजपुत, सोलापूर वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष व्ही.पी. शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी श्रीमती सरस्वती उंबरजे, ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. एन. देशपांडे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक  मुकुंद ढोबळे तसेच विधीज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातुन एकूण ६ हजार ६१३ प्रलंबित प्रकरणे, दाखलपुर्व २० हजार ३७५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणामधील तडजोड मुल्य १०८ करोड ६८ लाख ६३ लाख ३८० इतके राहिले.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये ३० वर्षे जुन एक प्रकरण , २० वर्षे जुन एक प्रकरण, १५ वर्षे जुनी दोन प्रकरणे, १० वर्षे जुनी ४२ प्रकरणे, ५ वर्षे जुनी ३५७ प्रकरणे अशी एकूण ४०३ जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली.

विशेष मोहीम

राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापुर्व दि. १७ मार्च २०२५ ते दि. २१मार्च २०२५ या कालावधीमध्ये   जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहीमे मध्ये ३० वर्षे जुन एक प्रकरण, २० वर्षे जुनी २२ प्रकरणे, १५ वर्षे जुनी १२ प्रकरणे, १० वर्षे जुनी ९० प्रकरणे, ५ वर्षे जुनी ८८८ व इतर अशी एकूण ९९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

 

Reactions

Post a Comment

0 Comments