जिजाऊ रथ यात्रा आज टेंभुर्णी शहरात,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 24, 2025

जिजाऊ रथ यात्रा आज टेंभुर्णी शहरात,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

 जिजाऊ रथ यात्रा आज टेंभुर्णी शहरात,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन




 
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून, या निमित्ताने जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा काढण्यात आली आहे. टेंभुर्णीत ही रथयात्रा सोमवार २४ मार्च रोजी येणार आहे.

या रथयात्रेच्या नियोजनासाठी गेले काही दिवस टेंभुर्णी अन् कुर्डूवाडी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. माढा तालुक्यातून असंख्य शिवप्रेमी नागरिक या रथयात्रेच्या स्वागतासाठी  व सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

'पंजाब सिंध, गुजरात, मराठा 
महाराष्ट्रात राहतो तो मराठा' याप्रमाणे अठरापगड जातीतील मराठा  बहुजन समाजबांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोड़ो अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी १८ मार्च रोजी शहाजी महाराजांच्या जन्मदिनी वेरुळ येथील भोसले गढी येथून जिजाऊ रथयात्रेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रदिनी १ मे रोजी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे. २४ मार्च  सोमवार रोजी या रथयात्रेचे आगमन पंढरपूरहून अकलूज टेंभुर्णी येथे होईल छत्रपती संभाजीराजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आगमन होईल. कुर्डूवाडीतील सभेसाठी रथयात्रा रवाना होईल गावदेवी मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जिजाऊ रथयात्रचे चौकाचौकात  स्वागत होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ मार्च रोजी मंगळवारी रथयात्रा कुर्डूवाडीहून माढा , मोहोळमार्गे सोलापुराकडे रवाना होईल.  जिजाऊ रथयात्रेच्या टेंभुर्णीतील
स्वागत सोहळ्याला व कुर्डूवाडीतील सभेला मराठा व बहुजन समाजातील युवक, युवती, महिला,पुरुष, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते,शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी टेंभुर्णीत आयोजित पत्रकार परिषदेत केले याप्रसंगी सतीश चांदगुडे-जि.संघटक,सचिन खुळे-ता.कार्याध्यक्ष,गोरख देशमुख,वैभव महाडिक-ग्रां.पं.सदस्य,मयुर काळे,विलास कोठावळे-विभागप्रमुख टेंभुर्णी,पपेश पाटील-शहराध्यक्ष मराठा सेवा संघ,योगेश मुळे-शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड,गणेश भोसले-ता.उपाध्यक्ष,
अशोक खटके,शरद लिगाडे,संजय देशमुख, महेश देशमुख,अमोल पाटील, अजय गायकवाड-तालुकाध्यक्ष का.आ, भारत जगताप-गटप्रमुख पं.स.टेंभुर्णी,विजय काळे-सदस्य मसेसं,योगेश मस्के-गटप्रमुख बेंबळे पं.स,दादा मुळे,गणेश थोरात, बाळासाहेब पवार,अविनाश नांगरे,नानासाहेब देशमुख,अजित बेसुळके,सचिन जाधव,विनोद देशमुख ई उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages