शंकरनगर येथील आरोग्य केंद्रात महर्षी प्रशालेतील शिक्षकांची तपासणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- निरोगी शिक्षक हाच देशाचे उज्वल भविष्य घडवु शकतो.देशाचे भविष्य घडविणारा शिक्षक, सदृड असावा भविष्यात होणारा संभाव्य आजार टाळता यावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्र व महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यांनी संयुक्तपणे सुमारे साठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपुर्ण रक्त तपासणी केली.
देशाचे भविष्य घडविण्यात शिक्षकाचे मोलाचे योगदान लाभत असते.त्यांच्या आरोग्याची काळजी घेवुन भविष्यातील गंभीर आजार रोखणे किंवा ओळखले तरच शिक्षक खर्या अर्थाने भविष्यातील सुसंस्कृत व जबाबदार नागरीक घडवु शकतील.आजाराचे वेळीच निदान व्हावे यासाठी महर्षी प्रशालेतील शिक्षकाची संपुर्ण रक्त तपासणी,रक्तातील साखर,बी.पी.तपासणीची मागणी मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कडे केली होती.
त्यांच्या मागणी वरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल अव्हाड,आरोग्य सेवक विलास झुरुळे व महालब टेक्निशियन सुवर्णा कारंजे यांनी तपासणी केली.
यावेळी स्थानिक प्रशाला समिती सभापती ऍड नितिन खराडे,सदस्य कैलास चौधरी,अनिल जाधव,नितिन इंगवले देशमुख, विनोद जाधव यांचे सह प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments