अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर चरणी साकडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 22, 2025

अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर चरणी साकडे

 अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर चरणी साकडे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रायगड येथील त्यांचे निवासस्थानी अनेकांनी समक्ष भेट घेऊन अदिती ताईंना शुभेच्छा दिल्या.
    अल्पावधीतच आदितीताई तटकरे यांच्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी  बहीण योजनेचा लाभ घेता आला. त्यामुळे आज प्रत्येक महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर
शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज चरणी आदिती ताईंच्या दीर्घायुष्यासाठी साकडे करण्यात आले. व त्यांच्या नावाने संकल्प सोडण्यात आला. यावेळी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, बोला बोला भक्तलींग हर बोला सिद्धेश्वर महाराज की जय, अशा घोषणांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी केले होते.
याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी आज आदिती ताई मुळे अनेक महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. आज ताईंचा वाढदिवस आज लाखो महिलांनी आदिती ताई यांचा उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष वैभव गंगणे यांनी ग्राम दैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महा आरतीचे आयोजन करून आदिती ताई यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले त्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक असे प्रतिपादन व्यक्त करत आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
   सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत आदिती ताई तटकरे यांना वाढदिवसा निमित्त सह शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवती विभाग अध्यक्ष किरण माशाळकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, समदानी मत्तेखाने, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके,उमादेवी झाडबुके, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे सचिन चलवादी, आशिष म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages