बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचा बडगा
सोलापूरात १२, मुंबई-बंगलोरमध्ये २ जण ताब्यात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी घुसखोर यांना प. बंगाल, आसाम, कर्नाटक राज्यातून कागदपत्रे मिळाल्याचे तपासात उघड झाल्याचे उत्तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देतानाच सोलापूर येथे बारा, आणि मुंबई व बंगलोर येथे अन्य दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
आज विधानसभेत सुभाष देशमुख यांनी सोलापूर एमआयडीसी नई जिंदगी भागात विमानतळाशेजारी, आणि कणबस द.सोलापूर येथे अवैध मार्गाने आलेले बांगलादेशी राहत असल्याचे निदर्शनास आणले.सदर बांगलादेशी आधारकार्ड मिळवून राहातात असेही त्यांनी सांगितले व शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतिना केली.
उत्तरात पुढे गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की,एमआयडीसी अक्कलकोट रोड येथे बांगलादेशी अनधिकृतरित्या राहतात असे समजल्यावर दहशतवाद विरोधी पथक, एमआयडीसी पोलिस ठाणे यांनी कारवाई केली सदर कारखान्यात बारा बांगलादेशी आढळले.त्यांच्या जबाबानंतर बंगलोर व भिवंडी येथून अन्य दोघांना ताब्यात घेतले.ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींच्या ताब्यातून ६८ हजार ५००रु. किंमतीचे १२मोबाईल. सिमकार्ड,आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट जप्त केले आहेत.संबंधीत कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे. कोणालाही कामावर घेताना हमीपत्र घेणे बंधनकारक आहे असेही गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी उत्तरात सांगितले.
त्या आरोपींवर कडक कारवाई
पुणे जिल्ह्यात राजगडमधील साखर या गावी जमावाने केलेल्या दगडफेक घटनेबाबत भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियमनच्या विविध कलमांतर्गत ३२ अटक आरोपींना सोडणार नसून त्यांचवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. किरकिटवाडी फाटा येथे राहणाऱ्या मुलाने औरंगजेबविषयी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला ठेवलेल्या स्टेटसचे स्क्रीन शॉट राजगड तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते.
याप्रकरणी काही संघटनांनी वेल्हे पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. त्यानुसार या मुलाच्या पालकांकडून पोस्ट चुकीची असल्याचे मुलास सांगून ही पोस्ट मुलाने डिलीट केली. याप्रकरणी पोलिसांनी विरोध केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक करून शासकीय वाहनाचे नुकसान केले. यामध्ये दोन पोलीस अंमलदार जखमी झाले होते.
0 Comments