कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन साजरा

 कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिन साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे सोलापूर येथे 8 मार्च 2024 रोजी प्रशालेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्र विकास प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका मंगला नाईक नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त कुमठे प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. रूपाली खाडे व राष्ट्र विकासच्या विद्या मंदिर च्या सहशिक्षिका सौ. कांचन कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास  कुमठे  प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गंगे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संजय जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमास  प्रशालेतील  सर्व महिला शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेतील  सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. जमखंडी कर यांनी केले.तर सूत्रसंचालन कुमठे प्रशालेच्या सहशिक्षिका सौ कुडले यांनी केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages