Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्या निकेतन प्रशालेत जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा

विद्या निकेतन प्रशालेत जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा


 

मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्या निकेतन प्रशालेत दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली पद्मसिंह सिरसट ह्या होत्या. याप्रसंगी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या रेश्मा पोटरे, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. संगीता गावडे, दिपाली सिरसट व दिपाली साखरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

     प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाने दि. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विद्या निकेतन प्रशालेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या रेश्मा पोटरे, सोनाली पाटील,संगिता गावडे, दिपाली साखरे, महानंदा गुंड, कांचन पवार, अंजना पोटरे, व वंदना दळवी या आठ कर्तबगार महिला भगिनींचा आदरपूर्वक, सन्मानचिन्ह  व बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

      याप्रसंगी उपस्थित सर्व माता पालकांचे यथोचित सत्कार करण्यात आला, वंदना दळवी यांनी 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याची गरज आहे असे आपल्या मनोगतातून प्रतिपादन केले. रविकांत साबळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून पटवून दिले. नागनाथ धुमाळ सरांनी महिला सबलीकरणाविषयी महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून दिपाली पद्मसिंह सिरसट यांनी विद्यार्थी हा शाळेत घडत असून शाळेत राबवणाऱ्या विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.

   यावेळी सर्व उपस्थित मतापालकांचे चरण पुजन करून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आशीर्वाद घेतले.
       याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची , जलद गतीने बाटल्या ठेवण्याच्या स्पर्धा व उखाण्याच्या स्पर्धा अशा विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी कुसुम पोटरे, शितल पोटरे, वंदना पोटरे, वैशाली फंड, अर्चना सिरसट, मिनाक्षी कोळी,श्रीमती सुमन व्हनकोंबडे चव्हाण ताई, पवार, प्रतिक्षा भोसले, हसीना शेख व बहुसंख्य माता पालक व प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पवार यांनी केले.तर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माता-पालकांचे शिवानंद बोधले यांनी आभार मानले.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजना पोटरे, गजानन पाटील, शहाजी आतकरे, गोविंद जांभळे व संतोष वाघमोडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments