संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलांचा सन्मान

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलांचा सन्मान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येतो महिला दिनी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी  व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व सन्माननीय महिलांचा सन्मान या दिवशी केला जातो पण समाजा च्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या जसे वीटभट्टी वरील कामगार महिला, कचरा वेचणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला, सफाई कामगार महिला, अशांच्या सन्मान संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात येतो यावर्षी सुद्धा चाळीस वर्षापासून सिद्धेश्वर मंदिरासमोरील फुटपाथ वरील पालावर सेवाभावी वृत्तीने गोरगरिबांसाठी अत्यल्प कमी दरामध्ये भोजन उपलब्ध करून देऊन आपल्या संसाराचा गाडा स्वाभिमानाने हाकणाऱ्या महिलांचा मानाचा फेटा सन्मानचिन्ह व मिठाई देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, सिद्धाराम सवयगी, सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, गजानन शिंदे, संतोष सुरवसे, यशवंत लोंढे, गौरीशंकर वरपे, रमेश भंडारे, सुमित मंदृपकर, मल्लिकार्जुन शेवगार, श्रवण साळुंके, बबन डीगणे, प्रेम भोसले, महिला जिल्हाध्यक्ष मीनलताई दास, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, माधुरी चव्हाण, संजीवनी सलबत्ते, जयश्री जाधव, अश्विनी पाटील, सुनिता घंटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages