सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हळदीकुंकू व महिला दिनानिमित्त दिनांक ७ मार्च २०२५ रोजी समाजकल्याण केंद्र रंग भवन येथे पुरुषांच्या बरोबरीने व त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आपल्या भगिणींचा सत्कार सोहळा वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठान संस्थापिका अध्यक्षा संगीताताई जोगधनकर यांनी आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मृणालिनी मोरे ( सायकोलॉजिस्ट,कोन्सलर ) व पद्मा सारोळे ( चंडक कॉलेज पर्यावरण शिक्षिक) यांची उपस्थिती होती.
व त्याच बरोबर सौ. मनीषा जोगधनकर, सौ.पवित्रा सोनकवडे, सौ.रेखा होटकर, सौ. प्रभावती व्हटकर, सौ छाया व्हटकर, सौ. रेश्मा सोनवणे, सौ. संगीता होटकर, सौ.वंदना होटकर, सौ.कांचन व्हटकर, सौ. रितु काटकधोंड आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments