छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात महिला दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय "वुमेन एम्पॉवरमेंट सेल" अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त डॉक्टर सुचित्रा पाटणकर यांचे "महिलांचे मानसिक आरोग्य" या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मानसिक समस्यांचा सामना पुरुषांच्या तुलनेने महिलांना अधिक प्रमाणात करावा लागतो. मानसिक आरोग्य उत्तम राखायचे असेल तर सर्वप्रथम शारीरिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे,चौरस आहार घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, सुसंवाद साधने गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. हार्मोनल असंतुलन, पीसीओडी, मासिक पाळीच्या समस्या यातून जात असताना महिलांना शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक आरोग्याशी ही मुकाबला करावा लागतो. आपले मानसिक स्वास्थ्य योग्य आहे की नाही हे सर्वप्रथम आपल्याला ओळखता आले पाहिजे.सततची होणारी चिडचिड, निद्रानाश, अति विचार तसेच वाईट विचार मनात येणे इत्यादी गोष्टी आपल्या बाबत होत असल्यास आपले मानसिक आरोग्य धोक्यात आहे हे आपण ओळखावे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे व गरज असल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना डॉ. राणी मोटे यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी विशद करून भारतीय समाजामध्ये रमाबाई रानडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांनी स्त्री शिक्षणाद्वारे स्त्रीमुक्तीची बीजे रोवली असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरुण मित्रगोत्री, प्रा.डॉ. अभिमन्यू ओहोळ, प्रा.डॉ. युवराज सुरवसे,प्रा.डॉ. वाल्मीक किर्तीकर, प्रा. भुसे, प्रा.कुचेकर, प्रा. गायकवाड, प्रा. जवळगीकर, प्रा. शहा. मॅडम,शहाजी जाधव ,संतोष अलकुंटे,केशव लोंढे, संजय थिटे, सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी स्त्री पुरुष असमानतेची दरी मिटवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वर्षाराणी शिंदे तर आभार प्रा.संघमित्रा चौधरी यांनी केले.
0 Comments