Hot Posts

6/recent/ticker-posts

किरण माशाळकर यांना समाजरत्न पुरस्कार 2025 प्रदान

 किरण माशाळकर यांना समाजरत्न पुरस्कार 2025 प्रदान  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवराणा युवा प्रतिष्ठान च्या वतीने समाज रत्न पुरस्कार 2025 सोलापूर येथे आयोजित करण्यात आले. एकूण पाच  पुरस्कारार्थी पैकी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली .सोलापूर चे आमदार विजयकुमार देशमुख मालक व मुन्ना वानकर यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना समाजरत्न पुरस्कार 2025  सन्मानित करण्यात आले. गेल्या 5 वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम किरण माशाळकर या करतात .महिला सक्षमीकरण ,महिला सबलीकरण ,महिला आर्थिक विकास, महिला बचत गट ,महिला कौशल्य विकास ,महिला रोजगार, महिला उद्योजकता, महिला संरक्षण या उद्देश वर स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून किरण माशाळकर काम करतात. महिलांच्या व मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कायम तत्पर असतात.महिलांच्या व मुलींच्या हितासाठी त्या काम करतात.शिवराणा युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रवी कोटमाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.भाजप चे सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,सूरज बंडगर व आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments