Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे २५ हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली .

 शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे

२५ हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली .

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्यावतीने बुधवारी राबविण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे २५ हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली . 25 हजाराहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळवेढा तालीमच्यावतीने मिष्ठांन्न जेवण देण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी यंदाच्या वर्षीसुद्धा शिवभक्तांना पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पार पडला. थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, कुशल संघटक संकेत भाऊ पिसे, व अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री उशिरापर्यंत जेवणाच्या पंगती सुरू होत्या.
पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांच्या हस्ते शिवपुजन करून शिवभोजन उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मेजयराजे भोसले, कोल्हपूरचे माजी महापौर सागर भाई चव्हाण, रीपाईचे राजाभाऊ सरवदे, सुयश गुरुकुलचे केशवराव शिंदे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहेब, चंद्रकांत वानकर, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे साहेब, दिनेशजी मलपे, मनोज शेजवाल, संकेत पिसे, सागर पिसे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते. सोलापुरात शिवजयंतीच्या लक्षवेधी मिरवणुका निघतात. या मिरवणुका पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसेच ग्रामीण भागातील शिवभक्त सोलापुरात येतात. भर दुपारी शिवभक्त सोलापुरात येतात आणि रात्री उशिरा आपापल्या घरी जातात. मात्र घरी जाताना त्यांचे जेवणाचे आबाळ होतात. ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाचे संस्थापक अमोल बापू शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या मिवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून सुरु केला . सुरवातीस ५ हजार, ७ हजार शिवभक्तांना आणि नंतर शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी जेवण देण्यास सुरुवात केली. मागील वर्षी २१ हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यंदा २५ हजाराहून अधिक शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे .मिरवणुक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था थोरला मंगळवेढा तालीम संघाकडून करण्यात आली होती .


बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ शिवभक्तांना टेबल खुर्चीवर शिवभोजन देऊन राबविण्यात आला.थोरला मंगळवेढा तालीम मंडळ आणि अमोल बापू शिंदे मित्र परीवारानं हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
------------------------------------
जेवनामध्ये हा होता मेनू !
------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरात निघणाऱ्या जल्लोषपूर्ण मिरवणूका पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना जेवन देताना ते अत्यंत सात्विक असावे या दृष्टीने मंडळाचे संस्थापक अमोल बापू शिंदे यांनी उत्तम नियोजन केले .जेवणाच्या ताटात पुरी ,दोन भाज्या, मसाला भात आणि गोड शिरा हा मेनू देऊन शिवभक्तांनी या शिवभोजनाचा लाभ घेतला. सुमारे 25 हजाराहून अधिक शिवभक्त या भोजनाचा लाभ घेणार असल्यामुळे बुधवारी सकाळपासूनच आचारी मंडळींनी स्वयंपाक तयार करण्यासाठीची लगबग सुरू होती.

-------------------------------------
शिवाजी महाराजांचा आदर्श
-----------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याचा गाडा हाकताना एकही मावळा उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेच संस्कार आणि दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सोलापुरात शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मिरवणूका पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची अडचण लक्षात घेऊन मिरवणुकीला संपूर्ण फाटा देत गेल्या काही वर्षापासून शिवभक्तांना भरपेट जेवन देण्याचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला सात हजार शिवभक्तांना जेवन देण्यात आले. मात्र दुसऱ्या वर्षापासून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांनासुद्धा त्यामध्ये सामावून घेत यंदाच्या वर्षी शिवभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 25 हजार शिवभक्तांना जेवण देण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला, याचा मनोमन आनंद वाटतो. मंगळवेढा तालीम संघाचे सर्व सहकारी या उपक्रमामध्ये अहोरात्र झटतात. त्या सर्वांना या उपक्रमाचे श्रेय जाते. आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत हा उपक्रम आगामी काळातसुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने राबविण्याचा आपला माणस आहे
- अमोल बापू शिंदे -
शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर.
Reactions

Post a Comment

0 Comments