Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपुरात छत्रपती शिवरायांच्या समोर राहुल सोलापूरकरच्या पुतळ्याला उलटं टांगून मारले जोडे !

 पंढरपुरात छत्रपती शिवरायांच्या समोर राहुल सोलापूरकरच्या पुतळ्याला उलटं टांगून मारले जोडे !

महर्षी वाल्मिकी संघाकडून शिवजयंती दिनी 

राहुल सोलापूरकरचा तीव्र निषेध 


पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटलेले असतानाच आज पंढरपुरात महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन केले आणि छत्रपती शिवरायांच्या समोरंच राहुल सोलापुरकरचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून त्याला जोडे मारत घोषणाबाजी केली.

राहुल सोलापूरकर असो वा अन्य कुणी जर आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक, आक्षेपार्ह विधान केले तर त्याचा निषेध अशाच पध्दतीने केला जाईल. यापुढे जर राहुल सोलापूरकर याने आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवले नाही तर त्याला प्रत्यक्षातच असे उलटे लटकावून जोडे मारू. अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments