श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल च्या दहावी विदयार्थ्यांना
एस के फौंडेशनकडुन शैक्षणिक साहित्य भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील एस.के. सोशल फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल भवानी पेठ मधील इयत्ता दहावी विदयार्थ्यांना कै.श्रावणी इप्पलपल्ली यांचे स्मरणार्थ सनतकुमार इप्पलपल्ली यांचे कडून शैक्षणिक साहित्य लेखन पॅड, पेन भेट दिले. या कार्यक्रमांस एस.के फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. श्रीनिवास कटकूर यांचे अध्यक्षते खाली , पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त संगीताताई इंदापुरे, उदयोगपती श्रीनिवास येले व सचिव यशवंत इंदापुरे, माजी प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सर,प्रशालेचे प्राचार्य राम ढाले सर , उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम शाळेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर प्राचार्य राम ढाले सरांनी प्रास्ताविक भाषणांत शाळेचे प्रगतीबाबत माहिती दिली. यावेळी शाळेचे वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यांत आले. संगीताताई इंदापुरे यांनी मार्गदर्शन पर भाषणांत महाभारतातील कर्णाचे दानशूर व्यक्तीमत्व प्रमाणे देणगीदार सनतकुमार इप्पलपल्ली हे मागील अनेक वर्षापासून दरवर्षी पत्नीच्या नावाने विविध शाळेतील होतकरू गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य निस्वार्थ भावनेने मदत करतात आपण ही चांगले गुण मिळवून असेच समाज कार्य करावे असे सागितले. प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी दहावीच्या विदयार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. अँड.श्रीनिवास कटकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणांत जिद्द,चिकाटी आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. चांगले मार्क मिळविले तरच चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सागितले. यशवंत इंदापुरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून दहावी च्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दहावीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी लेखन पॅड, पेन या शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.आभार उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर यांनी मांनले. महादेव वांगीकर सर सुत्रसंचलन केले
0 Comments