नागपूर येथील द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षपदी
ॲड. राजन दीक्षित यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सोनार समाजाचे प्रणेते अॅड. राजन दीक्षित यांची नागपूर येथील द्वारकाधीश प्रतिष्ठांनच्या कार्याध्यक्षपदी अध्यक्ष सौ. अंजलीताई अनासणे यांनी नुकतीच पुणे येथे झालेल्या मिटींगमध्ये निवड केली. नागपूर येथील द्वारकाधीश प्रतिष्ठानद्वारे विविध सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मीक उपक्रम गेली १० वर्षे विनामुल्य राबविली जातात. तसेच या प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या महिन्यात नागपूर येथे भेट घेऊन पंढरपूर येथे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांचे नांवे भवन व विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, तसेच एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी व अन्य स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोर्टी येथे संत नरहरी यांच्या माता पित्यांच्या समाधीचा पुर्नविकास तसेच पंढरपूर येथील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये संत नरहरीचे मुर्ती स्थापना करण्यासाठी प्रतिष्ठांनमार्फत कार्यवाही सुरु आहे.
सदर अॅड. राजन दीक्षित यांच्या निवडीमुळे सदर प्रतिष्ठानला मोलाची मदत होणार असल्याचे अध्यक्ष सौ.अंजलीताई अनासणे व सुरेश अनासणे यांनी या प्रसंगी सांगितले. मुंबई येथील प्रभाकर मोरे तसेच माझे सहकार सह. आयुक्त संजीव खडके तसेच अनेक मित्र मंडळीनी अॅडव्होकेट राजन दीक्षित यांच निवडीबद्दल अभिनंदन केले.
0 Comments