Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना

 शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या 

वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली, त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले, 

यानंतर  मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, यांनी शिवजयंती निमित्त शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे,  श्रीकांत डांगे,  उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, विनोद भोसले, श्रीकांत घाडगे, घाडगे गुरुजी, मनोज गादेकर, सुनील रसाळे,  महेश हनमे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुणेकर, तात्यासाहेब वाघमोडे, मतीन बागवान,  बजरंग जाधव, मारुती सावंत, अमोल कळंब, सदाशिव पवार, नरेश मोहिते, रवी मोहिते, राजु सुपाते, विवेक इंगळे, अंबादास शेळके, प्रीतम परदेशी, ब्रम्हदेव पवार, लिंगराज जाधव, सचिन चव्हाण, सुभाष पवार, आदित्य घाडगे,  डॉक्टर, लक्ष्मणराव काळे, संदीप जाधव, अनिल छत्रबंद, सुनील शेळके, अनिल म्हस्के, जितू वाडेकर, विनायक टेंभुर्णीकर, महादेव गवळी, लहू गायकवाड, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, सचिन गुंड, प्रकाश ननवरे, गोवर्धन गुंड, विश्वजित गायकवाड, सोमनाथ शिंदे, सचिन स्वामी झ बसू कोळी, देविदास घुले, राजू काकडे, दिनकर जगदाळे, सुनील भोसले, प्रताप चौहान, रमेश जाधव, राम माने, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, रोहन माने, श्रीनिवास संगा, महेश जिंदम, सुष्माताई घाडगे, लता फुटाणे, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, लता ढेरे, मनीषा महाडिक, श्रद्धा कंदुरे, वंदना भिसे, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी भोसले, वैजयंती भोसले, चारुशीला जगदाळे, नीलिमा शितोळे, मनीषा माने, पूजा शेळवणे, दीपाली चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments