Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वस्त टोमॅटो, मेथी पडणार महागात: भाजी विक्रेत्यांमुळे विजापूर रस्त्यावर अपघाताला निमंत्रण

स्वस्त टोमॅटो, मेथी पडणार महागात: भाजी विक्रेत्यांमुळे विजापूर रस्त्यावर अपघाताला निमंत्रण
 

    

     सोलापूर (कटुसत्य वृत्त) :- 'ओ टमाटे घ्या हो दहा रुपये किलो, फ्लावर घ्या हो वीस रुपयाला गड्डा, मेथी घ्या हो दहाला दोन' अशी आरोळी नवीन नाही. मात्र ऐन धर्मवीर संभाजी तलावाशेजारी रेल्वे पुलावर सायंकाळच्या वेळी रिक्षा उभा करून स्वस्त भाजीपाला विक्री सुरू असते.   एके दिवशी हा स्वस्तातील भाजीपाला महागात पडणार आहे. अपघाताला निमंत्रण देणारी ही भाजी विक्री कुणाचा तरी जीव घेऊ शकते.  जुळे सोलापूरच्या प्रत्येक रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू आहे. सर्वत्र पदपथ भाजी पाला व फळे विक्रेत्यांनी काबीज केले आहेत. विजापूर रस्त्यावर धर्मवीर संभाजी तलावापासून थेट सैफुलपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला सर्वत्र भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. ही स्थिती भारती विद्यापीठासमोरील रस्ता तसेच डीमार्ट शेजारी आसरा पुलावरून येणाऱ्या रस्त्याची आहे.

या मार्गावर टिळक विद्यापीठाशेजारीही रस्त्याची संपूर्ण एक बाजू भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. सर्वत्र भाजी विक्री सुरू असताना धर्मवीर संभाजी तलावाशेजारी रेल्वे पुलावर दररोज सायंकाळी स्वस्तात भाजी विक्री करणारी रिक्षा उभी असते.  पुलाच्या तोंडावरच ही रिक्षा उभी असल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने लावून स्वस्तातील भाजी खरेदी करतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून सिग्नल सुटताच येथे वाहनांची गर्दी होते. या भाजी विक्रेत्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments