Hot Posts

6/recent/ticker-posts

परराज्‍यातील महिलांनीही घेतला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ

 परराज्‍यातील महिलांनीही घेतला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्‍या खात्‍यात जमा झाली आहे. मात्र, ऐन निवडणूकीच्‍या तोंडावर लागू करण्‍यात आलेली ही योजना बोगस अर्जांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अशात परराज्यातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांना लाभ देण्‍यात येत आहे.

लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार करत परराज्यातील तब्बल ११७१ अर्ज लाडकी बहीण योजनेत दाखल झाले. या अर्जांची छाननी केली असता ज्यांनी अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून अर्ज केले, ते उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ज्या दोन लॉगिनवरून १११ अर्ज दाखल झाले आहेत, त्यापैकी २२ अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणज एकूण २२ अर्ज हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे तपासात समोर आले आहे.

१,१७१ अर्ज बोगस
लाडकी बहीण योजनेत बोगस अर्ज वाढले असून लातूर, सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉगिन आयडी बनवून परराज्यातील लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे लॉगिन आयडी बनवून तब्बल १,१७१ अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे १,१७१ अर्ज म्हणजे १ कोटी २२ लाख ९५ हजार ५०० रुपये एवढी रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली आहे.

केवळ दोन लॉगिनवरून अर्ज
माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत केवळ दोन लॉगिनवरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या नावाखाली, ११७१ अर्ज दाखल झाले. मात्र, प्रत्यक्षात हे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments