Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्रशालेच्या सारिका बुधारामला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रॉझ पदक

 नेताजी प्रशालेच्या सारिका बुधारामला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रॉझ पदक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेतील सारिका दत्तात्रय बुधारामने चौथ्या राष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप तायक्वांदो स्पर्धेत ब्रॉझ पदक पटकाविले .
 गोव्यातील मापुसा करसवाडा येथील पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वांदो चॅम्पियनशिप फेडरेशन ऑफ इंडिया, तायक्वांदो ट्रेनिंग हॉल, डॉ. बी.आर. आंबेडकर स्टेडियम, बसवेश्वर नगर बेंगळुरू भारतीय ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्नित युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार मान्यताप्राप्त तायक्वांदो असोसिएशन ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या इंडियन ओपन राष्ट्रीय तायक्वांदो  चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सारिका दत्तात्रय बुधारामने ज्युनियर, महिला, ६८ किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त केले .या यशाबद्दल व पुढील स्पर्धेसाठी नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार  यांच्या हस्ते भेटवस्तु देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार,राजराजेश्वरी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, क्रीडा विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार, अशोक पाटील आदी उपस्थित होते. यशाबद्दल सारिका बुधारामचे अक्कलकोट रोड एम.आय.डी. सी.कामगार वसाहतीय कौतुक होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments