Hot Posts

6/recent/ticker-posts

तब्बल अठरा दिवसांनंतर उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचले

 तब्बल अठरा दिवसांनंतर उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचले




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- कुरनूर धरणाचे पाणी शेतकऱ्यांना सोडण्याआधीच उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून हा पाण्याचा प्रवाह आणखी पंधरा ते वीस दिवस तरी सुरू राहावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. आठ दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ. सचिन कल्याणशेट्टी
यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे गेला आहे; परंतु त्याआधीच काम युध्दपातळीवर सुरू आहे. कुरनूर धरणामध्ये उजनीचे पाणी यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा येऊन मिळाले आहे. साधारण निर्णय चार दिवस लांबणीवर ५ जानेवारीला उजनीतून पाणी सोडण्यात आले. १० जानेवारीला कारंबा पंप हाऊसमधून एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सुरू झाले. २५ जानेवारीच्या दरम्यान दर्गनहळ्ळी वितरण कुंडमधून दर्शनाळ कालव्याकडे पाण्याचा प्रवास सुरू झाला. दोन दिवसांपूर्वी हे पाणी पितापूर हद्दीमध्ये हरणा नदीत आले असून मंगळवारी हे पाणी प्रत्यक्षात कुरनूर धरणामध्ये येऊन पोहोचले आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार साधारण १० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सुरू राहील, अशी माहिती आहे; परंतु शेतकऱ्यांनी मात्र आणखी दहा ते पंधरा दिवस पाणी सुरू राहावे, अशी मागणी केली आहे. या विषयाबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी उजनीच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाठपुरावा केला होता.

चौकट 1
यावर्षी पाण्याचे योग्य नियोजन
सध्या कुरनूर धरणामध्ये ८४ टक्के पाणी आहे. जितके पाणी
धरणातून खाली जाईल. तितके पाणी उजनीतून कुरनूरमध्ये
येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पाण्याची काळजी करू
नये. दरवर्षीपेक्षा यावर्षी स्थिती खूप चांगली आहे. उजनी आणि
कुरनूरच्या पाण्याचे नियोजन योग्यरीत्या केले जात आहे.
सचिन कल्याणशेट्टी, आमदार

चौकट 2
रब्बी हंगामाला वरदान
कुरनूर धरणात उजनीचे पाणी येणे ही तालुक्यातील शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती आहे. आता उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होणार असल्याने रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची दारे उघडली जाणार आहेत. ही बाब आनंदाची आहे. विनोद पवार, शेतकरी मोट्याळ

Reactions

Post a Comment

0 Comments