श्री वीरतपस्वी पुण्यतिथी बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन
विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष श्री चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार, ३१ जानेवारी
रोजी शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व १ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता उत्तर कसब्यातील होटगी मठात व होटगी (ता. द. सोलापूर) येथील मठात शिवाचार्यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रध्दांजली समर्पण सभा होणार आहे. पहाटे ५ वाजता काशी जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात श्री चन्नयोगिराजेंद्र
शिवाचार्य महास्वामीजी हे आत्मज्योत शिरावर घेऊन हजारो भक्तगणांच्या समवेत भक्तिमय वातावरणात उत्तर कसब्यातील होटगी मठातून होटगीकडे सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ
होणार आहेत.श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त बाळीवेस येथील मठात बुधवार, ५
फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्री गुरु गादीस संगीत महारुद्र पूजा,
सहराबिल्वार्चन सायंकाळी ६ वाजता.शिवाचार्यांच्या सान्निध्यात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता गीतसंध्या व १० वाजता भजन व कीर्तन कार्यक्रम आयोजित
करण्यात आले आहे. रविवार, २६ जानेवारी ते बुधवार, ५ फेब्रुवारीपर्यंत बाळीवेस व होटगी येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री सिध्दांत शिखामणी पारायण व बाळीवेस मठात भजन,भारुड व कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.होटगी येथील २ फेब्रुवारी रोजी प्राईम केअर हॉस्पिटल व रेणुकाचार्य क्लिनिक यांच्या सौजन्याने डॉ. आप्पासाहेब उमदी यांच्या दवाखान्यात आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिविर आयोजित केले आहे. गुरुवार, ६ फेब्रुवारी सकाळी ११.०० वाजता आत्मज्योतीचे होटगी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येणार आहे.सायंकाळी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी बृहन्मठात दुपारी ४ वाजता नंदीध्वज व पालखी उत्सव सायंकाळी ७ वा. पाळणा रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम,९.३० वाजता कुंभारी येथील नाट्य संघ यांच्यावतीने आयोजित केलेला श्री चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी महात्मे हे सुंदर सामाजिक नाटक सादर होणार आहे. बुधवार,२९ रोजी बोरामणी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.संस्थेने आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमात भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आलेले आहे.
चौकट
उद्या व्याख्यान व आनंद मेळाव्याचे आयोजन
शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. कोल्हापूर येथील प्रा. युवराज पाटील यांचे 'चला नाते जपूया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार २, सोमवार, ३ फेब्रुवारी व मंगळवार, ४ फेब्रुवारी असे ३ दिवस सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० पर्यंत अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम तसेच कमवा व शिका या योजनेअंतर्गत भव्य आनंदमेळाचे आयोजन करण्यात आले असून या आनंदमेळ्यात सोलापूरकारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments