Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी शहर यांच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम. 700 ते 800 महिलांचा उस्फूर्तपणे सहभाग.

 हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी शहर यांच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम. 

700 ते 800 महिलांचा उस्फूर्तपणे सहभाग.  


  टेंभुर्णी (प्रतिनिधी)हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी शहर यांच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवण्यात आला व यामध्ये उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ चाही कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला 700 ते 800 महिलांनी उपस्थिती दाखवली व लकी ड्रॉ साठी प्रथम बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही पूजा जयंत कांबळे व माया सुभाष इंगोले यांचे कडून बक्षीस देण्यात आले व दुसरे बक्षीस  ओव्हन  हे बक्षीस दीपा कुमार इंगोले व शिवानी गजानन कांबळे यांचे कडून देण्यात आले तिसरे बक्षीस पूर्ण किचन सेट हे बक्षीस मेघना मनोज पलंगे यांचे  कडून देण्यात आले चौथे बक्षीस  कुकर सेट हे बक्षीस सुरेखा विनोद रांजणकर यांचे कडून देण्यात आले पाचवे बक्षीस एक पैठणी साडी हे बक्षीस मनीषा गणेश कांबळे यांच्याकडून देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टेंभुर्णी गावच्या सरपंच सुरजाताई बोबडे व उपसरपंच राज्यश्रीताई नेवसे, लताताई देशमुख, सविताताई कोकाटे पुनमताई कुटे ,स्वरूपाताई बोबडे, स्वरालीताई बोबडे, मोनिकाताई बोबडे, सुषमाताई होदाडे, सुजाताताई ताबे, डॉ.मीनाक्षी गायकवाड, डॉ.गोरे मॅडम या  उपस्थित होत्या व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित र कार्यक्रम हिंदू खाटीक समाज महिला संघटना टेंभुर्णी शहर यांच्या वतीने राबवण्यात आला या कार्यक्रम महिला अध्यक्ष पूजा जयंत कांबळे व उपाध्यक्ष दीपा कुमारी इंगोले व सचिव मेघना मनोज पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी शहर अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष गजानन कांबळे ,सचिव मनोज पलंगे, खजिनदार मकरंद कांबळे, कार्याध्यक्ष आशुतोष पलंगे, सहसचिव सागर शिरसागर ,यांच्यासह पूर्ण हिंदू खाटीक समाज उपस्थित होता या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  पलंगे, कांबळे, इंगोले, क्षीरसागर, थोरात, रांजणकर, जठार  परिवाराने परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments