Hot Posts

6/recent/ticker-posts

बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या आरोपीस नातेपुते पोलिसांनी केले जेलबंद, अनर्थ टळला

 बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या आरोपीस 

नातेपुते पोलिसांनी केले जेलबंद, अनर्थ टळला

 नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मार्केट यार्ड रत्नप्रभा शाळेसमोर गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ८: ३० वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे अल्ताफ अखेर आतार रा. खडक गल्ली नातेपुते ता. माळशिरस, सुरज दिलीप वाघमारे रा. तीन कॉलनी चाळ वालचंदनगर ता. इंदापूर, अनिकेत महेंद्र रणसिंग, निखिल तानाजी हुलगे दोगे राहणार रणगाव ता. इंदापूर, अनिल मारुती कारंडे राहणार निमसाखर ता. इंदापूर यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून कोणास तरी मारण्याच्या उद्देशाने  बेकायदा तलवार बाळगल्याने नातेपुते पोलिसांनी वरील आरोपी नामे यांना तात्काळ अटक केली असल्याने पुढील घडणारा अनर्थ टळला .पो.कॉ. रणजीत मदने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून वरील आरोपीस जेरबंद केले . याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नातेपुते मार्केट यार्ड रत्नप्रभा शाळेसमोर बाजार समिती जवळ पाच इसम धारदार शस्त्र घेऊन कोणास तरी मारहाण करण्यासाठी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पो.कॉ. रणजीत मदने यांना मिळाली असता नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पोलीस हेडकॉन्स्टेबल धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल बोराटे रणजीत मदने हे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी अल्ताफ अखेर आतार रा. खडकगल्ली नातेपुते ता. माळशिरस, सुरज दिलीप वाघमारे रा. तीन कॉलनीचाळ वालचंदनगर ता. इंदापूर, अनिकेत महेंद्र रणसिंग, निखिल तानाजी हुलगे दोगे रा. रणगाव ता. इंदापूर, अनिल मारुती कारंडे रा. निमसाखर ता. इंदापूर हे पाच इसम सदर ठिकाणी गोळा होऊन बसले होते इसम नामे अनिल कारंडे यांच्या हातात एक लोखंडी तलवार होती पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.सांच्याकडे २ हजार किमतीची लाकडी मूठ असलेली स्टीलची तलवार, क***** रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच ४२ एबी ३२६९ अंदाजे किमंत २५ हजार तसेच एक बिगर नंबरची लाल रंगाची टीव्हीएस रायडर मोटरसायकल अंदाजे किंमत २५ हजार तलवार व दोन मोटरसायकल असा एकूण ५२ हजार रुपये चा मुद्देमाल आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना जेरबंद करण्यात आले असून सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पोलीस हेडकॉन्स्टेबल देविदास धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत मदने नितीन पारसे रमेश बोराटे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार सत्यवान पाटकुलकर हे करीत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments