दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’ दि. 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2025

दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’ दि. 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’

 दि. 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे  आवाहन

  सोलापूर (कटूसत्यवृत्त):-दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. या  योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन  अर्ज सादर करण्यासाठी दि. 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती  दिव्यांग वित्त  विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे. 

       दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

            गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात  आले आहे. दिव्यांग व्यक्तींना https://register.mshfdc.co.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन दिव्यांग वित्त  विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले  आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages