सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एम.आय.टी. इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात प्राचार्य मनिष पुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.स्नेहसंमेलनात विद्याथ्र्यांनी महत्त्व,वाहन पंचमहाभूतांचे शिवराज्याभिषेक, विवेक, महिला सशक्तीकरण, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते, सामूहिक नृत्य, एकल नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मारुती चित्तमपली,प्रविण तळे, डॉ. व्यंकटेश मेतन,रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष डॉ. नील अंजुटगी, सचिव अमित कामतकर, योगीन गुर्जर, डॉ. स्वप्नील शेठ, प्राचार्य राजकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.विद्यार्थी समर्थ होळगी,नंदिनी गंगावती यांनी वार्षिक अहवाल सादर केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीशैल हडपद,अश्विनी मेटकरी, अश्विनी पांढरे,सरस्वती कांबळे, नमिता अथणीकर, प्रियंका मुंडे,प्रिया कासट,शांतकुमार साबळे,अजय पारीख, दिनेश हबीब, औदुंबर लोंढे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments