Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय राज्य शूटिंगबॉल स्पर्धेत आश्रम शाळेचा संघ महाराष्ट्रात प्रथम

 शालेय राज्य शूटिंगबॉल स्पर्धेत आश्रम शाळेचा संघ महाराष्ट्रात प्रथम




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- येथील जय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १९ वर्षा खालील विद्यार्थ्यांच्या संघाने शालेय राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत संभाजीनगर विभागास नमवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.तसेच हा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत यश मिळविले आहे.पुणे विभागाकडून खेळण्यासाठी या संघास संधी मिळाली होती.यावेळी प्रथम अमरावती विभागास व नंतर छत्रपती संभाजी नगर विभागास धूळ चारून संघाने फायनलमध्ये नाशिक विभागाचा पहिला डाव २१ विरुद्ध १७ व दुसरा डाव २१ विरुद्ध १६ अशा फरकाने नाशिक संघाचा पराभव करून महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.या संघाची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

**प्रताप घोडके,ऋतुराज वाघमारे,प्रणव वाघमारे,जयेश जमादार,शंभू लोंढे,श्री सोनवणे,मनिष रांजणकर,प्रेम मोहिते, विजय कांबळे व सुमित आरडे अशी खेळाडू विद्यार्थ्यांची नावे आहेत.

यावेळी प्रशिक्षक म्हणून प्रा.संतोष शिंदे व रेणुकादास वाळके यांनी कार्य केले.
यशस्वी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलास सातपुते,अध्यक्ष प्रशांत साळे,प्राचार्य जयश्री गवळी,मुख्याध्यापिका आगवणे,प्रा.शुभम सातपुते व प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच टेंभुर्णीकरांच्या वतीने ही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments