Hot Posts

6/recent/ticker-posts

अनिल सावंत मंगळवेढ्यात राष्ट्रवादीकडून जिजाऊ प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम

 अनिल सावंत मंगळवेढ्यात राष्ट्रवादीकडून जिजाऊ प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- जिजाऊंच्या समतेचा, बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश शिवाजी महाराजांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत आपल्याला दिसून येतो.जिजाऊदेखील समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या, असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मंगळवेढा शहर व तालुका यांच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ प्रेरणा पुरस्कार २०२५ देण्यात आला. यावेळी सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण अनिल सावंत, लक्ष्मण ढोबळे, प्रथमेश पाटील, साहेबराव पवार, संतोष नागणे, नानासाहेब करपे,अंकुश शिंदे आदीजण उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले, असे म्हणाले. यावेळी स्मिता अवघडे, सुनीता नवनाथ चव्हाण, संगीता सूरजसिंग राजपूत, सविता तानाजी सगट,महादेवी अंकुश शिंदे, नंदा शंकर ओमने, वंदना रामचंद्र जगताप, राधीका शिरसट, पूजा मुंढे यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक चंद्रशेखर कौंडूभैरी यांनी केले. सूत्रसंचालन जमीर इनामदार यांनी केले तर आभार संतोष रंदवे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments