माढा शहरातील विकास कामांसाठी १२ कोटींचा निधी:साठे
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील विविध विकास कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
झाल्याची माहिती नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. माढा शहरात स्वच्छ भारत २.० अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान, नागरी दलितेतर सुधार योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत निधी मंजूर झाला असून त्यामधून माढा शहरातील स्ट्रीट लाईटसाठी एक कोटी,घनकचरा व्यवस्थापनासाठी ५५ लाख, पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ७५ लाख, शहरातील गाळे बांधण्यासाठी एक कोटी,सार्वजनिक शौचालयांसाठी ९० लाख, अग्निशमन केंद्र स्थापन करण्यासाठी एक कोटी ७५ लाख, तसेच शहरातील कंपौंड वॉल, पेव्हर ब्लॉक, आरसीसी इन लाईन गटार, रस्ते डांबरीकरण नगरसेवक करणार उपोषण माढा नगरपंचायतीच्या रमाई आवास योजनेकरीता ३२९ लाभार्थ्यांना रितसर परवाना दिला आहे परंतु मंजूर निधीपैकी ३ कोटी ९ लाख ८ हजार ५०० रुपये निधी न मिळाल्याने नगरसेवक नितीन साठे २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. व काँक्रीटीकरण अशा कामांसाठी बारा कोटींचा निधी मंजूर झाल्याचे नगराध्यक्षा साठे यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी नेहा कंठे, उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे,नगरसेवक अजिनाथ माळी, सभापती नितीन साठे, विकास साठे, अरूण कदम, बाळासाहेब पवार, वंदना लंकेश्वर, सुनिता राऊत यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments