Hot Posts

6/recent/ticker-posts

बांधकाम विभागाने कामे वेळेत व मार्चपूर्वी पूर्ण करा,असे जंगम यांनी आदेश दिला

बांधकाम विभागाने कामे वेळेत व मार्चपूर्वी पूर्ण करा,असे जंगम यांनी आदेश दिला  



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शाळा, अंगणवाडी, रस्त्यांसह इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करून शंभर
टक्के निधी खर्च करावा अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

यांनी दिल्या.सोमवारी, सीईओ जंगम यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करा, कामे सुरू झाली नाहीत ती कामे जी तातडीने सुरू कोहिनकर, बांधकाम एकचे करून मार्चपूर्वी संपूर्ण निधी खर्च करा,आदेश दिले.२०२४-२५ असे मध्ये बांधकाम विभागाकडून किती कामांना मंजुरी दिली. किती कामे सुरू करण्यात आली आहेत,याविषयी तालुकानिहाय आढावा घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मुख्य यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. २०२३ - २४ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मंजूर झालेली कामे जिल्ह्यात सुरू आहेत. ती कामे आतापर्यंत ६० टक्के पूर्ण झाली आहेत. शाळा,रस्ता आणि अंगणवाडीसह इतर कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले. 

Reactions

Post a Comment

0 Comments