Hot Posts

6/recent/ticker-posts

'प्रिसीजन'ला सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार प्रदान

 'प्रिसीजन'ला सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार प्रदान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिल्लीच्या ग्रीन एन्व्हायरो फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा सेफ्टी एक्सलन्स प्लॅटिनम आणि गोल्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रिसीजन कॅमशॉफ्ट लिमिटेड या कंपनीला समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.११ जानेवारी रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या एका विशेष
समारंभात प्रिसीजन कंपनीचे वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक सुहास पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीची वचनबध्दता आणि कामगिरी दर्शवतो. ग्रीन एन्व्हायरो फाउंडेशन ही एक समर्पित संस्था आहे.प्रभावी कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यावर ही संस्था लक्ष केंद्रित करीत असते. या पुरस्काराच्या पहिल्या फेरीनंतर प्रिसीजनची व्हर्च्यूअल मुलाखतीसाठी निवड केली आणि नंतर सर्व ज्युरी सदस्यांनी या प्रतिष्ठित सेफ्टी एक्सलन्स प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार - २०२५ साठी प्रिसीजनची निवड केली.प्रिसीजनने मागील ३० वर्षांपासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता,कस्टमर फोकस, कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे.प्रिसीजन डीएनए आणि कार्यसंस्कृतीमुळे कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसीजनची जगात ओळख निर्माण झाली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments