Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या खो-खो पटूंनी रचला इतिहास

 सोलापूरच्या खो-खो पटूंनी रचला इतिहास



वेळापूरचा रामजी आणि खंडोबाचीवाडीच्या अश्विनीचा विश्वचषकात डंका
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-
महिला विश्वचषक खो-खो स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेल्या अश्विनी शिंदे या विद्यार्थिनीने, तर माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील रामजी कश्यप या पुढे गोळा करणाऱ्या कुटुंबामध्ये वाढलेल्या खेळाडूने सोलापूरचा डंका जगात गाजवला आहे. या दोन खेळाडूंनी
महिला व पुरुष खो-खो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत पहिल्यावहिल्या विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालत सोलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
आपल्या मुलीने शिक्षणाबरोबरच खेळात करिअर करावे, अशी अश्विनीचे वडील अप्पासाहेब आणि आई अनुराधा यांची इच्छा होती.
आपल्या कामगिरीची यशोगाथा सांगताना अश्विनी म्हणाली, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील
खंडोबाचीवाडी हे आमचे गाव. घरात खेळाचे वातावरण. वडील कुस्तीपटू. भाऊ जयकुमार राज्य खेळाडू, मोठी बहीण किरण हिने ३ 'खेलो इंडिया' स्पर्धेत भाग घेतला होता. अश्विनीनेही महाराष्ट्र संघातून खेळताना १४ राष्ट्रीय स्पर्धेतून १३ सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. त्यात तीन वेळा 'खेलो इंडिया' स्पर्धेचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील 3/4 व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचीही ती मानकरी ठरली. पहिल्याच वर्षी १४ वर्षाखालील गटाची पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण आणि भुवनेश्वर येथे दुसरी राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्णपदक मिळवले. माझ्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू संघात होते. परंतु उपांत्य व अंतिम सामन्यात माझी सर्वात चांगली कामगिरी झाली. त्यामुळे मला जानकी हा पुरस्कार मिळाला. तोच माझा अविस्मरणीय व आनंदाचा क्षण असल्याचे अश्विनी शिंदे हिने सांगितले.

पुट्टे गोळा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील रामजी कश्यप

नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी रामजी कश्यपची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. सलामीच्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात पहिली स्काय डाइव्ह व पहिली विकेट रामजी कश्यपच्या नावावर होती.
आई-वडील व्यवसायाच्या शोधात उत्तर प्रदेशमधून सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे आले. येथे वास्तव्यास आल्यापासून गेली ३० वर्षे पुठ्ठे गोळा करण्याचा व्यवसाय त्याचे कुटुंबीय करत आहेत.
वेळापूर येथील प्राथमिक शाळेत रामजीने शिक्षण सुरू केले. त्यानंतर इंग्लिश स्कूल वेळापूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे खऱ्या अर्थाने त्याच्या खेळाची सुरुवात झाली. कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची. वडील हरिचंद्र, आई कमल, भाऊ रामनारायण, अजय, बहीण
अंजली आणि रामजी असा हा परिवार रोज गावातून पुठ्ठे गोळा करून उदरनिर्वाह चालवायचा. रामजीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सलग दोनवेळा मिळवला. अकरा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने १० सुवर्ण तर १ रौप्य पदकाची कमाई केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments